धारपांचा मी नियमीत वाचक असे. वाचनालयातील दिवसाच्या २ पुस्तकांच्या कोट्यातून धारप, गुरूनाथ नाईक, अर्नाळकर व  सुहास शिरवाळकर  ह्यांची आलटून पालटून पुस्तके वाचीत असे. धारपांच्या पुस्तकांवर उड्या पडत व बऱ्याचदा यादीतली पुस्तके सहजा सहजी मिळत नसत मग ज्याने कोणी हे पुस्तक नेलेले असे त्या माणसाचा छडा लावून तेथे नंबर लावला जाई. 'आपण पुस्तक परत करायला एकत्र जाऊ' पासून ते पुस्तकांची परस्पर आदला बदल होत असे.
वर्तमानपत्रातल्या धारपांच्या मृत्युच्या बातमीने ह्या सगळ्या आठवणी उजळ झाल्या व संजोप रावांच्या ह्या लेखाने त्यांना वाट मिळाली.
धारपांच्या आत्म्यास शांती लाभो हीच 'समर्थ' चरणी प्रार्थना !