इतकी वर्षे माणसे पाहिल्यावर माणसांना लेबले चिकटवणे निरर्थक वाटते.
माणसे त्याहून गुंतागुंतीची आहेत आणि ती बहुधा आपल्याला अंशःतच कळतात.
आपल्याला न भेटलेले त्यांचे एक आयुष्य असते आणि म्हणून त्यांच्याविषयी
निष्कर्ष शक्यतो काढू नयेत. काढलेच तर ते आपल्यापुरते समजावेत.
-विजय
तेंडुलकर.
हे वाक्य फार भावले. शिवाय कुणाचेही आयुष्य आणि त्यातील गुंतागुंत सोपी करून सांगितली तरी ती पूर्ण
चित्र नसते. माणसांना भरपूर 'डिस्काउंट' द्यावा. त्यांचे आयुष्य आपण
जगलेलो नसतो.
हेही वाक्य मनाला पटले....
आपण फार क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करतो आणि पूर्वग्रह बाळगतच आयुष्य जगतो... अर्थात दरवेळी असा "डिस्काउंट" देणे जमेलच असे नाही..........
माणसेच तर महत्त्वाची.....
पण या लेखाच्या निमित्तने आपली दृष्टी थोडी तरी विशाल झाली व अधिक मोठी क्षितीजे कवेत आली तरी खूप झाले.