आज सगळीकडे "वेबसाईट" साठी "संकेतस्थळ" असा  मराठी प्रतिशब्द योजला जातो तो काहीसा न पटण्यासारखा आहे. संकेत हा शब्द तिथे वापरता येणारच नाही.  कारण संकेत म्हणजे इशारा. मग, वेबसाईट मधून कुठे आणि कसला इशारा मिळतो? (आणि संकेत चा इंग्रजीत अर्थ होतो "इंडिकेशन". पण मग वेबसाईटच्या ऐवजी इंडिकेशनसाईट असे म्हणावे लागेल.) पण आता तो सगळीकडे सर्रास वापरला जात असल्याने कदाचित त्यावर कोणी आक्षेप घ्यायचा विचार केला नसावा.

संकेतस्थळ यापेक्षा अंतर्जालस्थळ हा शब्द जास्त योग्य वाटतो, नाही का?

शब्द मोठा असला तरी योग्य आहे असे मला वाटतं. कारण कोणत्याही शब्दाच्या बाबतीत शब्दाच्या लांबीपेक्षा योग्यायोग्यतेचा विचार प्रामुख्यानं व्हावा.

कृपया प्रतिसाद कळवावेत.