संकेत म्हणजे नुसता इशारा, खूण, करार, बोली, अट, किंवा ठराव-नियम नव्हे. संकेत म्हणजे भेटण्याचे स्थळ.  या अर्थाने हा शब्द फार पुरातन काळापासून वापरात आहे. त्यामुळे वेबसाइटसाठी याहून योग्य शब्द मिळणे दुरापास्त. संस्थळ हा अत्यंत कृत्रिम आणि निरर्थक शब्द. सम् म्हणजे एकत्र(संगम), अप्रतिम(संगीत), पूर्ण(संज्ञान, संस्कार), , शुद्धीकरण(संस्कृति), नाश, आकुंचन(संहार, संकोच) वगैरे.  संस्थळमध्ये सम्‌ चे हे अर्थ घातले तर काहीही निष्पन्‍न होणार नाही.

संकेतस्थळ म्हणजे 'पान' नक्कीच नाही.