मानस,

चक्रपाणिंनी म्हटल्याप्रमाणे हे २ शेर नीट जमले नाहियेत. कच्चे उतरलेत. तरी, मला अपेक्षित अर्थ मांडतो -

मतला - एखादा विचार आपल्या मनात येत राहतो. त्याला फारसं यश मिळत नसलं तरी, धिटाईने तो पुन्हा पुन्हा येतच राहतो. आणि आपणही तो आला की झटकून टाकतो... किंवा तसं झटकून टाकलंय असं स्वतःलाच भासवतो. पण तो चिवट विचार आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेलाच असतो.

लढाई - तसा सरळ अर्थ आहे. आजचे युद्धखोर आपमतलबी पुढारी आम जनतेला गोड बोलून हुलकावणी देत राहतात - की आता ही लढाई संपलीच समजा. आपण जिंकतोय, नव्हे जिंकलोच! वस्तुस्थिती अशी असते की या सुरू केलेल्या लढाया कधीच संपत नाहीत. त्या समाजजीवनात अगदी खोलवर झिरपतात... घरा-दारापर्यंत पोचतात.