असे शब्द प्रथम उच्चारून पाहावेत. आपोआपच कशाला काय जोडावे लागेल हे समजते.
उदाहरणार्थः
कार्यसिद्धी हाच शब्द घेऊ.
उच्चारून पहा, प्रथम द चा आणि मग ध चा उच्चार होतो. प्रथम ध चा नंतर द चा उच्चार करून हा शब्द म्हणताच येणार नाही.
(कार्यसिद् धी)
त्यामुळे हा शब्द (किंवा यासारखे इतर शब्द जसे युद्ध, बद्ध, क्रुद्ध, असंबद्ध इ.) "कार्यसिद्धी" असा लिहिण्यापेक्षा नेहमी कंसात दिल्याप्रमाणे लिहिल्यास जास्त चांगले!! अर्थात द् नंतर लगेचच धी लिहावा. इथे या पानावर लेखन करताना तसे शक्य नाही. तसे लिहिले तरी ते कार्यसिद्धी असेच उमटते. हीच पद्धत अशा इतर शब्दांसाठी वापरावी.
.......कृष्णकुमार द. जोशी