'संकेत' म्हणजेच जर 'स्थळ' होत असेल तर, 'संकेतस्थळ' चा अर्थ काय? 'स्थळ-स्थळ'?

संकेत म्हणजेच स्थळ होत असेल तर, संकेत स्थळ म्हणण्या ऐवजी 'जाल-संकेत' असे म्हणायला हवे! नाही का?

संकेत म्हणजेच स्थळ होत असेल तर, 'जाल-संकेत' म्हणजेच 'वेब-साईट'.

मला वाटते, संकेत चा अर्थ स्थळ होत नाही / होत नसावा.

संकेत स्थळ चा अर्थ खालील प्रमाणे अपेक्षीत असावा असे मला वाटते.

" एखाद्या कंपनीच्या वगैरे माहीतीजालावरच्या स्थळाकडे आपल्याला जाण्यासाठीचा संकेत"

(म्हणजेच वेबसाईटचा पत्ता)

म्हणजेच : "संकेत स्थळ" हा "वेबसाईट(Website)" चा प्रतिशब्द नसून " वेबसाईटचा पत्ता(URL = Website address)" या साठी तो प्रतिशब्द आहे.

 असे मला वाटते.