पुलस्ति,

गझल अतिशय सुंदर आहे...

अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे...
सुंदर.

'मिठाई' हे शीर्षक बघून शेर कसा असेल हे अजिबात लक्षात आलं नाही, विनोदी असेल असं फार तर वाटलं - पण अंतर्मुख करणारा शेर आहे. जगजीत सिंगची क्राय फॉर क्राय ध्वनिफीत आहे, त्यातला-
भूखे बच्चों की तसल्ली के लिए
मां ने फिर पानी पकाया देर तक...
हा शेर आठवला.

विठाईचा शेरही असाच सुंदर आहे - गझल लिहावी तर अशी!

- कुमार