संकेत या शब्दाचा ठराव असा एक अर्थ आहेच, त्यामुळे संकेतस्थळ म्हणजे ठरविलेले स्थळ. तांबडा पीतांबर हे उदाहरण मी मुद्दाम दिले होते. हा किंवा पिवळा पीतांबर हे शब्द जर बरोबर असतील(नव्हे ते आहेतच! ) आणि संकेतस्थळात जर अशीच द्विरुक्ती होत असेल, तर हरकत असायचे काही कारण नाही. इंग्रजीत क्वार्टर्स म्हटले की रेसिडेन्शियल क्वार्टर्स हा अर्थ अभिप्रेत असतो. आणि नुसते क्वार्टर म्हटले की पुढे पेग किंवा पॅन्ट म्हणायची गरज नसते. तसेच संकेतस्थळ म्हणजेच संकेत! दोन्ही शब्द एकाच अर्थाचे. पण संकेतचे इतरही अर्थ आहेत. घोटाळा होऊ नये म्हणून संकेतस्थळ म्हटलेले बरे. आणि एकदा एक शब्द विशिष्ट अर्थाने रूढ झाला की, तो काहींच्या मते जरी अचूक नसला, तरी रूढ झाला तो झाला हे धोरण असावे. नाहीतर हा शब्द वापरून केलेले तमाम लिखाण व छपाई बदलावी लागेल.
स्थळ म्हणजेच स्थळाचा पत्ता. इंग्रजीत दोन शब्द असले आणि मराठीत एकाच शब्दाने काम भागत असेल तर काय हरकत आहे? यूआरएल ह्या तीन शब्दांसाठी फारतर संकेतस्थळाचा पत्ता म्हणावे. सामासिक शब्द करून भाषा क्लिष्ट करायचे मला तरी काही कारण दिसत नाही.