(कार्यसिद्‌ धी)

त्यामुळे हा शब्द (किंवा यासारखे इतर शब्द जसे युद्ध, बद्ध, क्रुद्ध, असंबद्ध इ. ) "कार्यसिद्धी" असा लिहिण्यापेक्षा नेहमी कंसात दिल्याप्रमाणे लिहिल्यास जास्त चांगले!!

बालोद्‌यान आणि बालोद्यान यांचा उच्चार (आणि कदाचित अर्थही) एक नाहीत. त्यामुळे कार्यसिद्धीच बरोबर, कार्यसिद्‌धी लिहिणे साफ चुकीचे!   तसेच आत्‌ म्याने, शुद्‌ धलेखन, द्‌वं द्‌व,  वगैरे. वाचणारा पायमोडक्या अक्षरापाशी किंचित थांबतो, त्यामुळे शब्दाचा वेगळाच नको असलेला उच्चार होतो. सद्‌वर्तन या शब्दाचा उच्चार  सद्‌ वर्तन्‌ असा होईल . म्हणजे मदरचा मॉट हर केल्यासारखा. खरा उच्चार सद्वर्‌-तन्‌ असा आहे. त्यामुळे फक्त ट, ठ, ड, ढ या अर्धा अक्षरदंड असलेल्या व्यंजनांना य-र-व खेरीज अन्य अक्षरे जोडायची असतील तरच नाइलाज म्हणून, या व्यंजनांचा पाय मोडून जोडाक्षर लिहावे. उदा. स्पोर्ट्‌स, लॉर्ड्‌ज़, गॉड्‌ज़ वगैरे. अन्य कुठल्याही व्यंजनाचा पाय मोडून जोडाक्षरे बनवू नयेत. (अपवाद:क्वचित तीन व्यंजने जोडून आली तर एका व्यंजनाचा पाय मोडायची पाळी येते.) याला मराठी शुद्धलेखन म्हणतात.