मला "तिष्ठणे", "ताटकळणे" पेक्षा - "बिलगणे"च अपेक्षित आहे. हा राग, खंत
त्या दिंड्या-पताकांबद्दल नाहीच आहे. "कल्लोळ" विठाईतच होत नाही.
विठाईलाच स्थितप्रज्ञ देवत्वाचा "मोह" सुटत नाही असं सुचवायचंय. नाहीतर ती
केव्हाच रस्त्यावर उतरून कामाला लागली असती. जरा अधिक खोलात जाऊन... ही
"विठाई" समष्टीतल्याच नव्हे तर व्यक्तीमधल्या गृहीत "चांगुलपणा" चं प्रतीक
आहे.
- स्पष्टीकरणाबद्दल आभार. आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट कळले. त्यादृष्टिने विचार केल्यास असे वाटते की "अजून कल्लोळ" ऐवजी 'मुळीच विचलित' किंवा 'मुळीच कल्लोळ' असे काही वापरलेत तर तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ अधिक सहजपणे पोहोचेल. अर्थात ही टीका नाही, फक्त मला सुचलेला विचार आहे. शब्दांची निवड हा तुमचाच अधिकार आहे.