मिलिंद फणसे आणि चक्रधर१ यांनी उत्तर बरोबर ओळखले आहे. हार्दिक अभिनंदन.
मस्त कलंदर, तुमचा अंदाज मात्र चुकलेला आहे. प्रतिसादाखातर धन्यवाद.
त्याच गीताची पुढली कडवी पाहा:
नशीबावर काही जोर चालत नाही
तो ऋतू आहे हा, जो मुळी बदलत नाही
कधी होती बदनशीबी
कधी होती मम गरीबी
कुणाकुणाचे नाव घेऊ
मला प्रत्येकाने छळले
बेदरकार, कृतघ्न ही दुनिया आहे
अशी असेल तर, काय ही दुनिया आहे
न कमी दोस्तांची होती,
न दुष्मनांची कमी होती
कधी दुष्मनीने लुटले,
कधी दोस्तीने छळले
प्रकाशाची भीती मला बसली आहे
अंधाराची सवय मला झाली आहे
जोवर अंधार राहिला,
माझा वेळ चांगला गेला
मला चांदण्याने लुटले,
मला उजेडाने छळले