मी आणि माझा मित्र मागच्याच महिन्यात भुशी डॅम इथे गेलो होतो. परतीच्या मार्गावर वाहतुकीचा मुरंबा (ट्रफीक जॅम) असल्यामुळे आम्ही तिथल्याच एका चिक्की विकणाऱ्या मुलाकडून शेंगदाणा चिक्की घेतली. ही चिक्की केवढ्याला- हीचा भाव काय - असे विचारल्यावर तो चक्क हिंदीतून बोलला. वास्तविक तो एक सातवीतला मराठी शाळेत जाणारा होता. मी त्याला हटकल्यावर तो काहीही न बोलता निघून गेला पण मराठीत बोलला नाही.