'एक्स्पायरी'ला समाप्ती/संपणे कसा वाटतो?
निवर्तणे हा शब्द छानच आहे, पण तो सामान्य जनतेला थोडासा अपरिचित असावा असे वाटते. ('जरा जास्तीच हायक्लास वाटतो.')
'पेटंट संपल्यावर', 'संपलेल्या/समाप्त पेटंटवर', 'पेटंट समाप्तीआधी/संपण्याआधी' ह्या शब्दप्रयोगांत संपणे/समाप्ती हा शब्द कसा वाटतो?
समाप्ती हा शब्द औषधाच्या एक्स्पायरीसाठी कदाचित चपखल नसेल, पण पेटंटाच्या एक्स्पायरीसाठी योग्य वाटतो.