बिलगण्याविषयी थोडेसे ः
- खूप शोधाशोध केल्यानंतर आई एकदाची दिसली की लहान मुलाला अवर्णनीय आनंद होतो आणि ते आवेगाने तिला जाऊन बिलगते...

- प्रियकर आणि प्रेयसी निळ्या निळ्या चांदण्यात फिरायला गेले आहेत... गारवाही छान आहे... प्रियेच्या अंगभर गोड शिरशिरी पसरते आणि ती प्रियकरला हलकेच बिलगते...

- बाबांच्या कडेवर छोटू बसलाय... बाबांचे मित्र गप्पा संपवून निघालेत... दोन्ही हात ते छोटूच्या दिशेने पसरतात आणि त्याला आपल्याबरोबर (खोटं खोटं) घेऊन जाऊ इच्छितात.. पण छोटू दोन्ही हात बाबांच्या गळ्यात टाकून बाबांना पहिल्यापेक्षा अधिकच बिलगतो...

बिलगणे हा शब्दच मुळी कवळण्यासंदर्भातील अतिनिकटचे स्पर्शत्व दर्शवितो... अगदी सर्वांगाला सर्वांगाचा स्पर्श अपेक्षित नसला तरी एका देहाचा बराचसा भाग दुसऱ्या देहाला स्पर्शणे ही कृती बिलगणे या शब्दातून प्रतिबिंबत होत असते...
या निकषावर पुलस्ती यांनी ` विठाई `चा शेर घासून बघायला हरकत नाही...