खूपच सुंदर मार्गदर्शन , कृती व लेखनशैली.
माझी पद्धत. दूध तापले आणि निवत ठेवले की आपल्या हाताच्या बोटाला सहन होईल इतके दूध निवले की त्यात दही घालावे आणि चमच्याने सर्व बाजूने ५-६ सेकंद ढवळावे. बोटाला सहन होण्याइतक्या दूधाला विरजण लावले आणि ढवळले की हमखास दही लागते कोणत्याही ऋतुमध्ये. उन्हाळा कडक असेल तर दही अगदी थोडे पुरते आणि हिवाळा कडक असेल तर मात्र दही ५-६ चमचे दही लागते पातेल्याभर दुधाला.