बागेला पाणी घालण्यासाठी वापरतात तिला झारी म्हणतात(तेलाच्या झारीचा आकार कसा असतो हे मात्र पाहिलेले नाही) आणि स्वयंपाकात वापरायचा, गाळण्यासारखी भोके असलेला (पूर्वी लोखंडाचा हल्ली) स्टीलचा लांब दांड्याचा चमचा हा झारा असतो असे वाटते.
तज्ज्ञ खुलासा करू शकतील काय?
झारी या शब्दाचा झरण किंवा ज्यातून तेल पाणी इ वाहते(झरते) ती झारी असा अर्थ असावा बहुतेक. झारा शब्दाची व्युत्पत्ती काय असावी? झाऱ्याला आणि झारीला हिंदीत काय म्हणतात?
साधारण स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक भांड्यांबद्दल, चमच्यांबद्दल कोणी एखादा माहितीपर लेख लिहिला तर तो मनोरंजक होईल असे वाटते.
--अदिती