आणि स्वयंपाकात वापरायचा, गाळण्यासारखी भोके असलेला (पूर्वी लोखंडाचा हल्ली) स्टीलचा लांब दांड्याचा चमचा हा झारा असतो असे वाटते.
हो अदिती, हाच तो झारा.
झारा - वडे-भजी-पुऱ्या-पापड तळणे, पोहे ढवळणे
कालथा/उलथणे - हे पण पूर्वी लोखंडाचे मिळत होते आता स्टीलचे मिळते. रवा भाजण्यासाठी, डोसा-घावन बाजुने सोडवण्यासाठी व उलटण्यासाठी, भाजी परतण्यासाठी, ढोकळ्याचा चोकोनी आकार करण्यासाठी, शंकरपाळे व चकोल्यांच्या पोळीला आकार देण्यासाठी, पुरणपोळी उलटण्यासाठी
डाव - पातळ पदार्थ ढवळण्यासाठी व वाटीमध्ये वाढून घेण्यासाठी
चमचा- कढल्यात फोडणीकरून त्यात कांदा-मिरची घालून ढवळण्यासाठी, कढल्यात रवा भाजण्यासाठी रव्याची खीर करताना
कढले - कढईचे खूप छोटे रूप, एखाद्या पदार्थला वरून फोडणी घालण्यासाठी यात फोडणी करतात.
भातवाढी - भात घेण्यासाठी, भाजी परतण्यासाठी