मीराबाईंच्या भजनाबद्दल धन्यवाद कर्णराव...
बाकी वीर झारा यातला झारा हा खरे म्हणजे जारा (ज खाली नुक्ता) असावा असे वाटते.
पण झारा आणि झारी हिंदीत आहेत हे ऐकून आनंद झाला. आता हिंदी भाषिक मित्रमैत्रिणींना पाककृती शिकवताना किंवा विचारताना जरा कमी त्रास पडेल.
बाकी झारीतील शुक्राचार्यांच्या गोष्टीला पौराणिक संदर्भ आहेत. नक्की तपशिल आठवत नाही पण बहुधा देवांना मिळालेले अमृत दैत्यांनाही (किंवा स्वतःला, चुभूदेघे) मिळावे म्हणून दैत्यगुरूंनी सूक्ष्मरूपाने अमृताच्या झारीत प्रवेश केला आणि अमृत ओतण्याच्या तोटीत बसून ते अमृत (किंवा जे काही पेय असेल ते) पिऊन टाकले अशी काहीशी कथा असावी. (चुभूदेघे.)
साधारणपणे, बिरबलाच्या गोष्टीत जशी बादशहाने प्रजेला वाटायला दिलेल्या खजिन्यापैकी एकच मोहर प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोचली आणि इतर माल वाटेतच हडप झाला तसाच प्रकार करून इतरांच्या वाट्याच्या किंवा हक्काच्या गोष्टी मधल्यामध्ये लंपास करणाऱ्या संधीसाधू लोकांना 'झारीतील शुक्राचार्य' असे म्हणतात असे वाटते.
(याही बाबतीत ) तज्ञांनी (!!! ) अधिक खुलासा करावा ही विनंती
--अदिती