मला आठवत असलेली कथा याप्रमाणेः

वामनावतारामध्ये विष्णुने बळीराजाकडून तीन पावले जमीन मागितली होती. या दानाचा संकल्प सोडण्यासाठी बळीराजाने झारीतून पाणी घेतले. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनरूपात आलेल्या विष्णुला ओळखले आणि या दानाचा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून ते सूक्ष्मरूपाने झारीमध्ये जाऊन बसले. त्यावरून झारीतील शुक्राचार्य हा शब्दप्रयोग आला.

या शब्दामागे हडप करणे/संधीसाधूपणा हा अर्थ नसून एखाद्या कार्यामध्ये उघडरित्या विरोध न करता गुपचुप विघ्ने आणणारे लोक असा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. चुभूदेघे.