इंग्रजीत व्याकरणाच्या  एका  विशिष्ट नियमानुसार चौक, शाळा, महाविद्यालय, चर्च इत्यादी शब्द अध्याहृत ठेवून वाक्ये बनवली तरी चालतात असे शिकल्याचे आठवते. तो मला पिकॅडलीला भेटला. माझे प्राथमिक शिक्षण नूतन मराठीत झाले आणि पुढचे फ़र्ग्युसनमध्ये. तो दर रविवारी सेंट जोसेफ़्‌ज़ला जातो. तशाच पद्धतीने संकेतस्थळातला स्थळ गाळला तरी तोच अर्थ होत असला पाहिजे. (स्थळ गाळला हे, त्या विशिष्ट नियमानुसार, व्याकरणदृष्ट्या चूक नाही.)--अद्वैतुल्लाखान