चौक, शाळा, महाविद्यालय, चर्च इत्यादी शब्द अध्याहृत ठेवून वाक्ये बनवली तरी चालतात ..... माझे प्राथमिक शिक्षण नूतन मराठीत झाले आणि पुढचे फर्ग्युसनमध्ये. ....

मराठीत तर ह्याहीपुढचा एक प्रकार मी ऐकलेला आहे.

पुण्यात नाट्यकर्मींच्या एका समूहात एक नाट्यकर्मी दुसऱ्याला म्हणत होता, "अरे तू ये ना परवा. परवा भरतला राज्यला बेडी टाकतोय!" (= "परवा भरत नाट्य मंदिरात राज्य नाट्य महोत्सवामध्ये लग्नाची बेडी ह्या नाटकाचा प्रयोग करणार आहोत."  )