फॉर्म फ्याक्टर हायकूचा वाटतो. जे काही आहे ते, आवडले!

ढग आभाळात,
धारा धरणीवर,
पाऊस मनात..

थेंबांची नक्षी,
पाना-पानात,
रांगोळी मनात..

प्राजक्तासारखी,
शब्दांची पखरण,
मनातल्या मनात..

हे विशेष आवडले.

बाकी श्रावणातील पावसाळी वातावरणाला साजेशा वर्णनात प्राजक्त आणि आलीमिळी गुपचिळी काहीसे विसंगत वाटले. चू. भू. द्या. घ्या.