हा संगणक मला अर्ध्या किमतीत पडला त्यामुळे कुठलाही बिघडलेला सुटा भाग नवीन विकत 
घेणे अशक्य नव्हे पण १) संगणक हा पांढरा हत्ती असतो. किती ही त्यावर पैसे खर्च केले 
तरी कमीच. २) हल्ली सांद्र मुद्रिका चालक (CD Crive) वापरतो कोण? सगळे पेन 
ड्राईव्ह वापरतात.  त्यामुळे कधीतरी एखादे सॉफ्टवेअर टाकण्यापुरता जर तो वापरायचा 
असेल तर नवीन घेण्यात काय अर्थ आहे.  ३) ई-कचरा ह्या संबंधी आपण काही करू 
शकलो नाही तरी ही समस्या वाढेल असे काही करणे आपण टाळावे असे मला मनापासून 
वाटते.