धारप हे नाव घेतले की मनात एक भीतीचा काटा उभा राहत असे. मी फार लहानपणापासून धारपांची पुस्तके वाचली आहेत. ती कधीही स्थिरपणे वाचवत नसत आणि हातातून सोडवत ही नसत. एक वेगळीच अनुभूती देणारी अशी ती पुस्तके होती (आहेत म्हणणे योग्य. धारप गेले. पुस्तके आहेतच ! )
भयकथा अभिजात साहित्याचा भाग असोत वा नसोत. धारपांचे वाचकांच्या मनातील स्थान अढळ आहे.