यांतील दुमड आणि घडी हे माहितीचे शब्द. दुमडी, दुमडण हेही अर्थ न सांगता समजण्यासारखे. पण घडीक आणि घडणी यांचा अर्थ सहजासहजी आकलन होण्यासारखा नाही.
संपुट म्हटले की साधारणपणे करंडा डोळ्यासमोर येतो. किंवा द्रोण. त्यापेक्षा पुडी चालावा. हाही 'संपुट'चा एक अर्थ आहे.
पण पुडीमध्ये फारच थोडे मावते, घडीत तर एकच वस्तू. जास्त माल ठेवण्यासाठी मोठ्या आकारमानाचे चंची-बटवा किंवा गाठोडे अधिक योग्य.