ढग, धारा, थेंबांची नक्षी, मोराचे नाचणे, इंद्रधनुष्य, या साऱ्या घटना जनात, मनाबाहेर घडत आहेत.. नि या साऱ्या
घटनांना मनात प्रतिसाद आहे.. जसा, पाऊस मनात, रांगोळी मनात.. जरी नाव नाही घेतले, तरी हे घडण्याचा काळ
श्रावणच आहे.. आणि, श्रावण नि प्राजक्ताचा अतूट असा संबंध आहे. श्रावणात प्राजक्ताचे सडे पडतात.. तसाच शब्दांचा
सडा मनातही आहे.. पण, आता प्रतिसाद वेगळा आहे.. मी एकटी आहे, म्हणून, अळीमिळी गुपचिळी आहे.. एवढंच!