Shuddha Marathi, विकिकर, मिलिंद फणसे,
शब्द सुचवल्याबद्दल प्रथम आपणां सर्वांचे आभार मानतो. पण एक गोष्ट सांगायची राहून गेली होती ती म्हणजे हा शब्द संगणकाच्या संदर्भात हवा आहे.

मिलिंदसर,
आपण सुचवलेला 'संचिका' हा शब्द चांगला वाटतोय.

Shuddha Marathi,
जरी संचिका म्हटले की काही विवक्षित आकार डोळ्यासमोर येत नाही तरी संगणकाच्या संदर्भात चालून जाईल असे वाटते.

पण तरीही फोल्डर हा शब्द वापरून इतका गुळगुळीत झाला आहे की मराठीतही 'फाइल'प्रमाणे 'फोल्डर' तसाच वापरावा काय? याबाबत आपली मते कृपया कळवावीत.