कधीतरी विरजणाचा वंश बदलावा लागतो, त्यामुळे दह्याचा पोत चांगला राहतो
जर दुसरे विरजण मिळणे कठिण असेल आणि दही आंबट लागत असेल तर आधी कोमट दुधात तुरटी फिरवावी व नंतर विरजण लावावे. अर्ध्या लिटर दुधात तुरटीचे दोन ते तीन वळसे पुरतात. दहयाची मस्त कवडी पडते व आंबटपणाही कमी होतो.