आम्ही त्यासाठी अगदी देव पाण्यात बुडवून तन-मन अर्पून भक्तिभावानं टीव्हीपुढे बसायचो

अगदी खरंय! मी पण असे कयामत से कयामत तक मधली गाणी लागावीत म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करत असायचे. ते दुरदर्शनचे दिवसच वेगळे होते.

आजची काहीकाही गाणी तर सारखी कानावर आदळून आदळून शेवटी आवडायला लागतात असे वाटते.

ही काही माझ्या विशेष आवडीची गाणी:

१. आज से पेहले आज से ज्यादा खुशी आजतक नही मिली - चितचोर (लग्नात माझ्या बहिणीच्या नवऱ्याने म्हटले हे गाणे तेव्हा ते एकदम समर्पक वाटले म्हणून आवडायला लागले)

२. फुलले रे क्षण माझे - माझ्या लग्नाच्या वेळी ते कुणीतरी म्हटले होते. तेव्हापासून आवडते.

३. तुम से ही दिन होता है - जब वी मेट 

४. दाटून कंठ येतो - सर्वांगसुंदर गाणे.

५.   भिगे होंठ तेरे - वोओओहो.. हे आवडते

६. दिल मेरा चुराया क्यूं - अकेले हम अकेले तुम - यातली why did u break my heart? मधली आर्तता मनाला भिडते.

अंजू