तो मूळचा अर्थवाही असलाच पाहिजे, संस्कृतोद्भव (किंवा आणखी कोणताही 'उद्भव') असलाच पाहिजे असे नाही. प्रथमदर्शनी तो साफ निरर्थक असला तरी चालेल.

एकदम मोलाचं बोललात, मिलिंदसर. आपलं म्हणणं अगदी पटतं. पण प्रथमदर्शनी निरर्थक दिसणारा शब्द स्वीकारणं संस्कारित मनाला थोडंसं जड जातं. नाही म्हटलं तरी आपण सर्वजण त्या शब्दातून काहीतरी अर्थ काढायचा प्रयत्न करतोच. नाहीतर 'संकेतस्थळ' हा शब्द योग्य की अयोग्य अशी चर्चाच झाली नसती.

तरीही 'कॉम्युनिकेशन इज़ अ प्रोसेस बाय विच मीनिंग्ज़ आर एक्स्चेंज्ड बिट्वीन पीपल थ्रू दि यूस ऑव्ह् अ कॉमन सेट ऑव्ह् सिंबल्स' असं म्हणून प्रतिशब्दनिर्मिती करणे हे एक अत्यंत अनावश्यक काम आहे असं ठासून सांगणारे लोक आहेतच. हेच जर कुणी ऐऱ्यागैऱ्याने म्हटलं असतं तरी ठीक होतं. पण हे ठामपणे सांगणारे एक चांगले लेखक आणि मर्मज्ञ रसिक आहेत त्यामुळे कधीकधी आपल्या स्वतःच्या प्रतिशब्दयोजनेच्या निर्णयाविषयी शंका येते.

तरीही आपल्यासारख्यांचा असा प्रतिसाद पाहिल्यावर बरं वाटतं.