तज्ज्ञ नसले तरी माझ्या माहितीप्रमाणे -
मेंदूतील सर्व क्रिया रासायनिक सूत्रानुसार चालतात. भाषिक क्रिया एका भागात, गणिती व तार्किक क्रिया एका दुसऱ्या भागात, शारिरीक क्रियांचा आणखी तिसरा भाग वगैरे. खूप गणिते सोडवल्यावर तो भाग दमला तर दुसरा भाग वापरून उदा एक रपेट मारून आल्यास ताजेतवाने वाटते. हा एक प्रकार. दुसरा म्हणजे काय केल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते याचे 'कंडिशनिंग' (मराठी? ) बालपणापासून होते. उदा कोणाला गाणी ऐकून बरे वाटेल तर कोणाला गाऊन तर कोणाला आंघोळ करून! हे थोडे कॉग्निटिव्ह थेरपीत घुसणे झाले. म्हणजे अमके केल्याने मला बरे वाटेल असे ठरवले तर कालांतराने तसे खरेच वाटू लागते. बाळपणी आजुबाजूचे लोक काय 'म्हणतात', 'दर्शवतात' यावरून त्या त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबाबत काय वाटेल हे ठरत जाते.
प्रश्नांची उत्तरेः
१. बुद्ध्यांक म्हणजे मेंदूची तार्किक क्षमता मोजण्याचे एकक, साधन.
२. प्रश्न समजला नाही. (इसकाळातला लेख वाचायला हवा म्हणजे बहुधा कळेल. )
३. मेंदूची विशिष्ठ क्षमता वाढवण्यासाठी सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. सराव म्हणजे मेंदूतील सर्किटांना त्या त्या विचारप्रणालीमध्ये प्रवीण करणे. दुसरे म्हणजे आहार. वाढीच्या वयात मेंदूच्या वेगवेगळ्या क्षमता वाढवण्याकरता वेगवेगळे घटक उपयुक्त ठरतात. उदा तार्किक क्षमतेसाठी लोह.
४. मानसिक ताण म्हणजे सोप्या भाषेत खूप विचार करून दमणे! पण हे उत्तर अपेक्षित नसावे असे वाटते. क्र. २ प्रमाणे या प्रश्नाची पार्श्वभूमी समजण्यासाठी तो लेख वाचते. ताण हलका का / कसा होतो ते वर लिहिले आहेच.