एकूण अंतर अ किमी आहे असे समजू.
पहिल्याचा वेग 'व' किमी/ तास असेल आणि त्याला 'त' तास लागले असे मानले असता
व = अ / त म्हणून अ = व*त
(व - १५) = अ / (त + १२ / ६०) ====> व = १५ + ७५ त
(व - १८) = अ / (त + १५ / ६०) ====> व = १८ + ७२ त
यावरून त = १ (तास) हे काढता येईल.
म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या स्पर्धकाला अनुक्रमे ६०+ १२ = ७२ मिनिटे आणि ७२ + ३ = ७५ मिनिटे लागली.
या ठिकाणी अ, व, त हे तीनच चल (व्हेरिएबल्स) आहेत आणि तितकीच समीकरणे आहेत म्हणून व आणि अ च्या किंमतीही अचूक ठरविता येतील असे वाटते - (९० कि. मी. अंतर आणि ९० कि. मी. / तास हा पहिल्या स्पर्धकाचा वेग).
तसा ताळाही जमत आहे.