'संचिका' अधिकृत आहे असे म्हटल्यानंतर कुठलाही वाद शिल्लक राहात नाही, त्यामुळे या शब्दाची निर्मिती व्याकरणशुद्ध आहे की नाही ते तपासायची गरज नाही. तरीसुद्धा, संच म्हणजे एकवर्गीय वस्तूंचा गट/साठा किंवा जोडकाम करून बनवलेली वस्तू.
संचय म्हणजे (सजातीय किंवा विजातीय) वस्तूंचा साठा.
त्यामुळे फोल्डरमध्ये एकजातीय फायली ठेवायच्या आहेत की संमिश्र, यावरून संचिका म्हणायचे की संचयिका ते ठरवावे लागेल. एकदा 'संचिका' अधिकृत आहे हे समजल्यावर तिच्यात एकाच विषयाशी संबंधित फायली ठेवणे अनिवार्य आहे!