बुद्ध्यांक म्हणजे बुद्धिमत्तेचे मापन करणारी संख्या असे मला वाटते. माझे हे वाटणे चूक असेल तर पुढील मजकूर वाचण्याचे कष्ट घेऊ नयेत. 

आपण दिलेल्या तक्त्यात शिक्षण आणि बुद्ध्यांक यांचा सरळसरळ संबंध जोडला आहे. तसे खरेच असते का? मला तसे वाटत नाही. काही बुद्धिमान व्यक्तींना काही कारणामुळे शिक्षण घेणे शक्य होत नाही पण कधीकधी त्यांची बुद्धिमत्ता उच्चशिक्षितांपेक्षांही अधिक असते.

कितीतरी अल्पशिक्षित, निरक्षर मोलकरणी बुद्धीची चमक दाखवतात. असाच अनुभव कधीकधी भाजीवाले, रिक्षावाले यांच्याबाबतीतही येतो. शिक्षित/ उच्चशिक्षित लोक अशिक्षितांपेक्षा अधिक बुद्धिमान असतातच असे नाही असेही कधीकधी दिसते.