मी दिलेल्या तक्त्यामध्ये एक सुधारणा हवी आहे. >३० ऐवजी <३० हवे होते. मला वाटले की श्री. मीरा फाटक ही सुधारणा सुचवताहेत.  पण त्यांचा मुद्दा वेगळा होता. त्याचे उत्तर असे--ही शंका कुणालातरी येईल, म्हणूनच मी शिक्षण या स्तंभाच्या मथळ्यात  बहुधा हा शब्द टंकला होता.  अर्थ असा की, जर शालेय किंवा तत्सम शिक्षण घेतलेच ते विनासायास किंवा मोजकेच कष्ट घेऊन बहुतेककरून किती घेता येईल.  जर एखादी व्यक्ती शाळेतच गेली नाही तर अर्थात तक्त्यातला हा स्तंभ निरुपयोगी.

आता बुद्ध्यांकासंबंधी काही आणखी माहितीः

सोळा वर्षाच्या आतल्या मुलाचा बुद्ध्यांक=त्याचे मानसिक वय भागिले प्रत्यक्ष वय. लहान मुलांचा बुद्ध्यांक शून्यापासून ते अडीचशेहून जास्त असू शकतो.

मोठ्या माणसाचा बुद्ध्यांक= त्याचे मानसिक वय भागिले सोळा. हा आकडा शून्य ते दोनशे किंवा अधिक असू शकतो.

एका मोठ्या लोकसंख्येचा सरासरी बुद्ध्यांक=१००. त्यातल्या निम्या लोकांचा ८९ ते १११. ऐंशी टक्के लोकांचा ८० ते १२०. दहा टक्के लोकांचा ८०हून कमी आणि तितक्याच लोकांचा १२० हून जास्त.

ज्या मुलांचा बुद्ध्यांक ७५ हून कमी असतो, त्यांना शिकवताना फार मेहनत घ्यावी लागते. ८०-८५ पेक्षा कमी बुद्ध्यांकाची माणसे कमी बुद्धिमान असतात.  त्यांना फार डोके वापरावे लागेल अशी कामे करणे कठीण जाते. ९० ते १०० बुद्ध्यांकाची माणसे अधिकारी झाली तर त्यांना त्यांचे काम न जमण्याची शक्यता असते. वगैरे.