ज्या मुलांचा बुद्ध्यांक ७५ हून कमी असतो, त्यांना शिकवताना फार मेहनत घ्यावी लागते. ८०-८५ पेक्षा कमी बुद्ध्यांकाची माणसे कमी बुद्धिमान असतात. त्यांना फार डोके वापरावे लागेल अशी कामे करणे कठीण जाते. ९० ते १०० बुद्ध्यांकाची माणसे अधिकारी झाली तर त्यांना त्यांचे काम न जमण्याची शक्यता असते. वगैरे.

म्हणजे तुमचा तक्ता 'कसे असते' यासंबंधी नसून 'कसे असावे' ह्यासंबंधीचा होता तर. असो.

बुद्ध्यांकाच्या सूत्रात वापरलेले मानसिक वय कसे काढतात? माझ्या माहितीप्रमाणे मानसशास्त्रात त्यासाठी काही चाचण्या सांगितल्या आहेत. त्या चाचण्यांबद्दल कोणी काही सांगू शकेल काय? ह्यात बुद्धीचे विविध पैलू कसे तपासले जातात/ जातील ह्याबद्दल मला उत्सुकता आहे.