शुद्ध मराठींचा प्रतिसाद वाचल्यावर मलाही असेच वाटले होते. मात्र त्यांच्या प्रतिसादामधला बहुधा (बहुदा? ) शब्द वाचून मी काही लिहिले नाही.
शाळेत असताना बुद्ध्यांक मापनाची चाचणी काही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी झाल्याचे आठवते. मात्र त्या चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे आणि कोणत्या शाखेतील प्रशिक्षण त्यांना यशस्वी करेल ह्याचा सल्ला देण्यासाठी होता. त्याबरोबरच बुद्ध्यांकाचेही मापन केले होते. प्रश्नावलीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नपत्रिकेसारखे प्रश्न होते शिवाय खालील पर्याय उपलब्ध असताना त्यातील होणती गोष्ट तुम्हाला सर्वात आधी करावीशी वाटेल? अशा प्रकारचेही प्रश्न होते असे आठवते. अर्थात त्यावेळी मी केवळ पाचव्या यत्तेत असल्यामुळे आणि त्याला आता बरीच वर्षे लोटल्याने जास्तीचे आठवत नाही.