म्हणजे तुमचा तक्ता 'कसे असते' यासंबंधी नसून 'कसे असावे' ह्यासंबंधीचा होता तर. असो.
तक्ता कसे असते यासंबंधीच होता पण, तसे लिहिले तर पालकांच्या मनात आपल्या मुलांविषयी निष्कारण चिंता निर्माण होऊ नये म्हणून मुद्दाम विधाने थोडीशी मोघम करायचा प्रयत्न होता.
मानसिक वय कसे काढतात हे खरोखरच माहीत नाही. त्यासाठी त्यांतल्या तज्ज्ञांना विचारावे लागेल. मात्र देश, काल, परिस्थितीप्रमाणे मानसिक वय काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या पाहिजेत हे नक्की.
बहुदा म्हणजे खूप देणारी. 'बहुधा'चा मूळ अर्थ अनेक प्रकारे. द्विधाचा दोन प्रकारे, त्रिधाचा तीन प्रकारे तसाच! पण आता प्रचलित रूढ अर्थ बहुतेक, बहुतांशी.
'बहुधा' शब्द वापरण्यात थोडी सावधगिरी बाळगणे एवढाच क्षम्य(कीस्तुत्य?)हेतू होता.