मंजुशा, वरदा, अनेक आभार!
पुढच्या वेळेस करताना मेथीचे दाणे घालून करून पाहीन.
वरदा, ज्याप्रमाणे कृती दिलेली आहे ना, अगदी त्याचप्रमाणे केलेस तर नक्की पातळ डोसे होतील. डोसा तव्यावर गोल गोल फिरवताना आपण गंध उगाळतो ना त्याचप्रमाणे डाव डोश्याच्या पीठावरून गोल फिरवायचा, म्हणजे एकदा आतून वळसा आणि एकदा बाहेरून. म्हणजे डोसा सगळीकडून एकसारखा होतो शिवाय पातळही. डोसा घालताना पीठ घोटून घोटून घेणे व पातळ करणे.
रोहिणी