कल्पना खरोखरच विचारात घेण्यासारखी आहे. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा आणि बहुतदा चालते तर बहुदा का नको? केवळ संस्कृतमध्ये वेगळा रूढ अर्थ आहे म्हणून? मराठीच्या दृष्टीने विचार केला तर 'बहुदा' बहुदा चालायला हवा. मराठी शुद्धलेखनावर ग्रंथ लिहिणारे अरुण फडके आणि यास्मिन शेख यांना कळवायला पाहिजे.