दिवाळी अंकाकरता गझल, कविता, कथा, अनुभवकथन, लेख असे विविध साहित्यप्रकार  येण्यास सुरुवात झाली आहे. अंकाच्या मांडणीचे कामसुद्धा सुरू झाले आहे.

काही सदस्यांच्या सूचनेवरून अंकासाठी लेखन पाठवण्याची मुदत १० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक  सदस्यांना त्यांचे लेखन पूर्ण करून आमच्याकडे पाठवता येईल अशी खात्री आहे.

गद्य व पद्याचा अनुवाद, कथा, विनोदी कथा/लेख , व्यंगचित्रे या विभागात समाविष्ट होणारे लेखन पाठवण्याकरता  अधिकाधिक सहकार्य करावे अशी मनोगतींना विनंती.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने मनोगताचा दिवाळी अंक अधिक दर्जेदार होईल यात शंका नाही. अंकाविषयी इतर माहिती आणि घोषणा वेळोवेळी याच धाग्यात केल्या जातील. सदस्यांना लेखन पाठवण्यास काही सहकार्य लागले तर दिवाळीमनोगत या खात्याला व्य. नि पाठवावा.
धन्यवाद
अंकसमिती ०८