मीराताई, मानसशास्त्राची थोडीफार लक्षात राहिलेली माहिती देत आहे.

ह्या मानसिक वयाची संकल्पना फ्रेंच शास्त्रज्ञ आल्फ्रेड बिने याने मांडली. त्याच्यामते प्रत्येकाचे एक शारीरिक आणि मानसिक असे वय असते. समजा एखाद्या मुलाचे शारीरिक वय १० असेल आणि मानसिक वय ८ असेल तर ८/१० गुणिले १०० यावरून ८० हा त्याचा बुद्ध्यांक येतो.( बुद्ध्यांकाचे सूत्रः मानसिक आणि शारीरिक वयाचे गुणोत्तर गुणिले १००) 

याउलट एखाद्या १० वर्षाच्या मुलाचे मानसिक वय १२ असेल तर १२/१० गुणिले १०० यावरून त्याचा बुद्ध्यांक १२० येतो. सर्वसाधारण लोकात ९५ ते १०० इतपत बुद्ध्यांक आढळून येतो. मात्र जास्तीत जास्त १६० पर्यंत बुद्ध्यांक असणाऱ्या काही केसेस आढळलेल्या आहेत.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मानसिक वय काढणे खरेच अवघड काम आहे. साधारणपणे शिक्षण घेताना इयत्तांमध्ये दिसून येणाऱ्या अभ्यासाच्या प्रगतीवरून ढोबळमानाने काही अंदाज लावता येतो मात्र खात्रीशीर अनुमान काढता येत नाही. बिनेने याच्यादेखील काही चाचण्या तयार केलेल्या होत्या. ( विसरलो  ) मात्र जगातले विविध प्रकारचे लोक, संस्कृती, वागण्याबोलण्याचे वेगवेगळे संकेत यामुळे त्या सर्वच ठिकाणी वापरता येत नाहीत.

-सौरभ.