लिनक्सच्या आश्रयाला जाणं म्हणजे अगदीच वनवासात गेल्यासारखं. चॅटिंग वगैरेला रामराम.
कोण म्हणते कि लिनक्स मधे चेटिंग करता येत नाही? एकिगा डोट नेट वर जा तिथे मिळेल. माझा लिनक्स चा ४ वर्षाचा अनुभव सांगतो कि लॅपटॉप साठी लिनक्स सारखी प्रणाली नाहि. १९८० पासूनच जेव्हा हार्ड्वेअर आणि सोफ्ट्वेअर मध्ये तट पडले नव्हते तेव्हा पासुनच फ्री सोफ्ट्वेअर फोउंडेशन लिनक्स सारख्या मुक्त व विनाशुल्क प्रणाली वापरात आणण्यास प्रेरित करित होति. जर आपण हार्ड्वेअर विकत घेतले आहे तर त्यासाठी उपयुक्त असे सोफ्ट्वेअर पुरविणे हे त्या उत्पादकाचे कर्तव्य आहे. त्या सोफ्ट्वेअर साठी वेगळे पैसे का द्यावे लागेल पाहिजे?
नाही तरी विंडोज व्हिस्टा हा एक फ्लोप शो आहे हे बिल गेटसला समजून चुकले आहेच. सबब फ्री व ओपेन सोर्स सोफ्ट्वेअर हाच एक राजमान्य राजरस्ता आहे. मना सज्जना त्याची पंथेची जावे हे उचितच आहे.