लिनक्सच्या आश्रयाला जाणं म्हणजे अगदीच वनवासात गेल्यासारखं. चॅटिंग वगैरेला रामराम.
या एकाच (चुकीच्या) कारणासाठी लिनक्स आधारित प्रणाली न वापरणे चुकीचे आहे. लिनक्स आधारित वितरणांमध्ये pidgin, empathy, kopete, ekiga अशी अनेक सॉफ्टवेअरे आहेत जे वापरून तुम्ही चॅटिंग (अक्षरी व बोली) करू शकता. ही सर्व सॉफ्टवेअरे याहू, जीटॉक, एमएसएन खाती व्यवस्थितपणे हाताळू शकतात. skype, empathy, telepathy वगैरे वापरून तुम्हाला आवाजी गप्पा मारता येतील.
तुम्ही प्रामुख्याने ज्या कारणांसाठी ल्यापटॉप वापरणार आहात ते पाहता उबुंटू किंवा फेडोरा आधारित ल्यापटॉप घेणे तुम्हाला सर्वात सोयीचे पडेल. मला विचाराल तर तुम्ही www.dell.com/ubuntu बघा असा मी सल्ला देईन. मी साधारण दहा महिने उबुंटू ७. १/८. ०४ वापरत आहे. अतिशय चांगला अनुभव आहे.
१] माझा वापर पूर्ण घरगुती स्वरूपाचा राहील. ऑफिस, इंटरनेट भटकंती, वेब
कॅम चॆटिंग - याहू, गूगल, स्कायपी आदी. हे सगळं पूर्वीइतक्याच निरामयतेने
शक्य होईल का?
होय
२] देवनागरी लेखन वाचनात काय स्वरूपाचे अडथळे आहेत?
काहीही नाही. फायरफॉक्स ३. ० मध्ये युनिकोड वापरात काहीच अडचणी नाहीत. युनिकोड नसलेले डायनामिक फाँट वापरणारी संकेतस्थळे उदा. लोकसत्ता, सामना, लोकमत वगैरेसाठी तुम्ही त्यांचे फाँट ल्यापटॉपवर उतरवून घेऊ शकता. फायरफॉक्सचे पद्मा हे प्लगीन वापरूनही तुम्ही अशी अयुनिकोडित संकेतस्थळे बघू शकता. फक्त अयुनिकोडित प्रोप्रायटरी फाँट वापरणारी संकेतस्थळे बघण्यासाठी ऑपेरा हा ब्राऊझर वापरणेही सोयीचे आहे. इतर सर्व ठिकाणी फायरफॉक्स वापरता येईल.
लेखनासाठी मनोगत/उपक्रम/मिसळपाव/मायबोली सर्व संकेतस्थळे स्वतःची टंकनप्रणाली देतात. याउप्पर तुम्ही गमभन वापरू शकता. ते अतिशय सोपे आहे. एससीआयएम इनपुट मेथड वापरून इन्सक्रिप्ट किंवा फोनेटिक टंकन करणे उबुंटूमध्ये शक्य आहे. फायरफॉक्सचे इंडिक इनपुट प्लगीन वापरूनही तुम्हाला टायपिंग करता येईल.
३]
विंडोजइतकी ही प्रणाली युनिकोड सहाय्यक नाही असं मत ऐकण्यात आहे. डायनॅमिक
फॉण्ट पद्धतीवर आधारित लोकसत्ता आदी संकेतस्थळे दिसत नाहीत. युनिकोड
आधारित म. टा., सकाळ इ. व्यवस्थित (? ) दिसतात. किती खरं किती खोटं?
उबुंटूमध्ये ही संकेतस्थळे पाहण्यात काहीच अडचण येत नाही. मात्र ऑपेरा मध्ये मटा/सकाळ व्यवस्थित दिसत नाहीत... लोकसत्ता/सामना/लोकमत व्यवस्थित दिसते फायरफॉक्स मध्ये ही सर्व संकेतस्थळे उत्तम दिसतात.
४] विंडोजवर ’बरह’ उपकरणाचं बोट धरून आमचा देवनागरी युनिकोड प्रांतात संचार आहे. मॅकवर बरह नाही म्हटल्यावर कसं होणार?
मॅकपेक्षा उबुंटूमध्ये टंकन करण्यासाठी खूप उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. किंबहुना वेब आधारित टंकनप्रणाली वापरल्यास बरहसारख्या सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही.
५] विंडोज पीसीपेक्षा दीडपट जास्त पैसे भरून याला घरी घेऊन यावं इतका हा खरंच चांगला आहे का?
मॅक नक्कीच नाही. त्यापेक्षा उबुंटूचा विचार करा.
६] इतर उल्लेखनीय बऱ्या वा वाईट गोष्टी... [बॅटरीकाल इ. ]