'दा(ददाति-दत्ते) आणि धा(दधाति-धत्ते) ह्या दोन्ही तिसऱ्या गणाच्या धातूंचा अर्थ, दा(यच्छति) या पहिल्या गणाच्या धातूप्रमाणेच 'देणे' आहे हे खरे. शिवाय, कापणे अशा अर्थाचा दा(दाति) असाही दुसऱ्या गणाचा एक धातू आहे. पण या तीनही धातूंचा 'बहुधा'शी काही संबंध नसावा. संस्कृतमध्ये एकदा, एकधा ही दोन्ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. त्यांचे संस्कृत अर्थः एकदा=एकाच वेळी; एकदम; कधीकधी; एके काळी; एके वेळी; काही काळापूर्वी; एकवेळ; एकवेळां, इ. (यांतले पहिले तीन अर्थ मराठीत नाहीत. ) एकधा=अगदी; एकट्याने; एकत्र; एकदम; एका प्रकारे. (यांतल्या फक्त शेवटच्या अर्थाने हा शब्द मराठीत वापरता येईल.) असेच बहुधा हे एक क्रियाविशेषण अव्यय आहे.
'ध' हाही एक प्रत्यय आहे. त्याचे उदाहरण-द्विध. म्हणजे दुभंगलेला. यावरून आपण द्विधा हे स्त्रीलिंगी रूप वापरतो. उदा. द्विधा मनस्थिती. या 'ध' प्रत्यय लागून झालेल्या द्विधाचा 'धा'प्रत्यय लागून झालेल्या (दोन प्रकारे अशा अर्थाच्या) द्विधाशी काही संबंध नाही. पहिले विशेषण आहे तर दुसरे क्रियाविशेषण.
'धा' धातूचे धरणे आणि ठेवणे असेही दोन अर्थ आहेत. अदितींच्या श्लोकात 'मयि धेहि' आले आहे, अर्थ-माझ्यामध्ये ठेव. (मला दे नाही.) महसाम् चा अर्थ मोठे असा नाही तर, महस् म्हणजे तेज, कांती. आता श्लोकाचा अर्थ सहज लागावा.
'कल्याणानाम त्वमसि..' ह्या श्लोकात सूर्याची स्तुती आहे. पुणे विद्यापीठाच्या पदवीदानप्रसंगी, मूळ ज्योत्स्ना भोळेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेला हा श्लोक दरवर्षी गायला जात असे. आज बर्याच वर्षांनी हा श्लोक वाचायला मिळाला. अदिती जर पुणे विद्यापीठाच्या द्विपदवीधर नसतील तर, त्यांनी हा श्लोक कुठे वाचला, कोणत्या कवीचा आहे किंवा कुठल्या ग्रंथात आलेला आहे, हे त्या सांगू शकतील?---अद्वैतुल्लाखान.