जुन्या आठवणीत रमले लेख वाचताना. मलाही अमेरिकेत अशीच नैत्रिण मिळाली होती. आम्ही इतक्या जवळच्या मैत्रिणी बनलो होतो तिच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यात. ती खालच्या मजल्यावर रहायची. आम्ही वरच्या ..पहिला बर्फ पडलेला आम्ही पोचल्यानंतर दिड महिन्यानी. तेन्व्हा रविवार पहाट होती. मला काही कल्पना नव्हती. आम्ही पडदे सारून मस्त आरामात आठ पर्यंत लोळत होतो.. तितक्यात नवरा उठला आणी टीव्ही चालू करून पडदा उघडून बाहेर डोकावला.. मस्त बर्फ पाहून त्याची एकदम कळी खुलली आणि मला उठवून म्हणाला बाहेर बघ एक मज्जा आहे. मला झोपू दे रे म्हणत मी दुर्लक्ष्यच केला पण त्यानी हार मानली नाही. मी बाहेर पाहिला अन मला आनंदाचा धक्का बसला. मी प्रथमच बर्फ पडलेला पहिला होता. तितक्यात फोन वाजला तो खालच्या नैत्रिणीचाच होता. मग आम्ही दोघे आणि खालचे दोघे मस्त खाली जाऊन बर्फ खेळलो, बर्फात गेलेली गाडी साफ पण केली होती ..