मी नीश करता वैशिष्ठ्य हा पहिला आणि पटुता हा दुसरा शब्द सुचवला होता.  कोनाडा नव्हे.

खबदाड ऐवजी कोनाडा योग्य आहे असे माझे म्हणणे आहे. 

मोठ्या दालनात भिंतीमध्ये एकादी (विशेषतः शोभेची) वस्तू (पुतळा, चित्र वगैरे) ठेवण्यासाठी केलेली खोलगट जागा हा निश चा मूळ अर्थ आहे.  त्यावरून एकाद्या जागेत चपखल बसणाऱ्या वस्तूला तो विशेषण म्हणून वापरला जातो.

बौद्ध विहारात भिक्षूंना राहायची जागा अशी कोरून काढली असायची.  कार्ले-भाजे येथील लेणी पाहिली असतील त्यांना हे आठवेल. 

मी पूर्वी सुपर कंडक्टिंग सुपर कोलायडर या महाप्रकल्पावर काम करीत होतो.  त्या प्रकल्पात कण प्रवेगकाकरिता (पार्टिकल ऍक्सलेटर) जमीनीखाली ६० मैल परीघाचा आणि १० मीटर व्यासाचा बोगदा होता. त्यात ठीक-ठिकाणी आवश्यक यंत्रसामुग्रीकरता असे कोनाडे -नीश नियोजिले होते.

{थोरल्या बुशच्या कारकीर्दीत काँग्रेसने खूप खर्च वाढला म्हणून पुढे तो प्रकल्प रद्द केला.}

इति नीशपुराणम्

सुभाष