मेंदी हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. एक तर तो कोणत्याही विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे मेंदीला विरोध हेच मुळी चुकीचे वाटते. त्यात त्याचे असे कारण देऊन? निवळ बालिशपणा. लक्ष कशाला विचलित होईल? तेही एका विद्यार्थिनीच्या मेंदीमुळे दुसऱ्या विद्यार्थिनीचे?
जर असं होत असेल तर मग वर्गातील प्रत्येकास/प्रत्येकीस अंगभर गोशासदृश किंवा कफनीसदृश काहीतरी घालून यावे लागेल.
राहता राहीला संस्कृतीचा प्रश्न! असं आहे की समाजातील काही मूठभर लोकांनी काहीतरी टूम काढल्याने संस्कृतीला विरोध जरी होत असला तरी धोका मात्र नक्कीच नाही. कारण आपली संस्कृती इतकी तकलादू नाही. इथं आपलं तेच चांगलं म्हणण्याचा उद्देश अजिबात नाही, बर का!
पण, अशा संस्कृतीविरोधी गोष्टींना आपणच सातत्यानं विरोध करायला हवा. कारण विरोध नाही केला तर मात्र आपल्या संस्कृतीला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.एवढं मात्र नक्की. कारण असच होत राहिलं तर उद्या उठून कुणी साडीला विरोध करेल, सण साजरा करायच्या पद्धतीला विरोध करेल, विवाहासारख्या घटनेतील विधींचा विरोध करेल, आणि न जाणे कशाकशाला विरोध होईल.................
......................................... कृष्णकुमार द. जोशी