काही गोष्टी इथे मला स्पष्ट कराव्या लागतीलः

 कार्यसिद्धी हा शब्द कार्यसिद् धी असा जसाच्या तसा नाहीच लिहायचा.

यातला अर्धा म्हणजे पायमोडक्या द आणि धी हे एकापाठोपाठच लिहावेत मोकळी जागा न ठेवता. त्यामुळे पायमोडक्या अक्षरापाशी थांबायचे कारणच नाही.प्रश्नच नाही.

(इथे अडचण अशी आहे की मनोगताचा अक्षरसंपादक तसे उमटूच देत नाही. खाली दुसऱ्या क्रमांकाच्या बालोद्यान* या शब्दाबाबतही असेच झालेले आहे.)

आणि तुम्ही इतर काही शब्द सांगितले आहेत तेही वरीलप्रमाणे लिहावेत.

बालोदयान आणि बालोद्यान यांचा उच्चार (आणि कदाचित अर्थही) एक नाहीत.हे जरी मान्य केलं तरी त्यामुळे कार्यसिद्धीच बरोबर हे कसे काय?

हे जरा समजवाल का?

कृपया शंका दूर करावी/ कराव्यात.

............................... कृष्णकुमार द. जोशी